adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्टील चोरी करणाऱ्या तिघां आरोपींच्या पाचगणी पोलिसांनी आवळल्या मुसक्या, सुमारे 1 लाख 77 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत !

स्टील चोरी करणाऱ्या तिघां आरोपींच्या पाचगणी पोलिसांनी आवळल्या मुसक्या, सुमारे 1 लाख 77 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत !   सौ. शुभांगी सरोदे-...

स्टील चोरी करणाऱ्या तिघां आरोपींच्या पाचगणी पोलिसांनी आवळल्या मुसक्या, सुमारे 1 लाख 77 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत !  


सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.

[संपादक ; हेमकांत गायकवाड ]

 पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कासवंड धामुणसेवाडी येथील बांधकाम साइटवरून स्टील चोरी करणाऱ्या तिघां आरोपींच्या पाचगणी पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फिर्यादी डॉ. दीक्षित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बांधकाम साईटवरून सिमेंटच्या प्लेटा गंज अंदाजे 450 किलोग्रॅम वजनाचे लोखंडी गज टेम्पोतून अज्ञात इसमांनी चोरून नेल्याची फिर्याद पाचगणी पोलीस ठाण्यात दिली होती. त्या अनुषंगाने पाचगणी पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करीत पाचगणी पोलिसांना अखेर या तिघां आरोपींपर्यंत पोहचून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. (अजय हनुमंत भुजबळ आणि रमेश ननवरे चेतन दिलीप भगणे ) अशी तिघां आरोपींची नावे आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार निलेश माने करीत आहेत. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने एच रसाळ एस.एम थोरवे पो हवा. धायगुडे पो. कॉ.उमेश लोखंडे अमोल धर्मू जगताप आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

No comments