adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण, अंतर्गत तक्रार समिती परभणीत आढावा बैठक:- राज्य महिला आयोग सौ. रूपाली चाकणकर !

  कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण, अंतर्गत तक्रार समिती परभणीत आढावा बैठक:- राज्य महिला आयोग सौ. रूपाली चाकणकर !   सौ. शुभा...

 कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण, अंतर्गत तक्रार समिती परभणीत आढावा बैठक:- राज्य महिला आयोग सौ. रूपाली चाकणकर ! 


 सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (परभणी जिल्हा) प्रतिनिध 

[संपादक हेमकांत गायकवाड ]

परभणीत आज रोजी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध अंतर्गत तक्रारी समितीची आढावा बैठक संपन्न झाली. कार्यस्थिती महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि विश्वासार्ह वातावरण मिळावे तसे त्यांच्या तक्रारीचे तातडीने न्याय निवारण व्हावे या बैठकीचा मुख्य उद्देश होता. या बैठकीत जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी,प्रशासकीय प्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणासोबत सखोल चर्चा करण्यात आली महिलांना कोणत्याही प्रकारच्या छळाविरुद्ध निरडपणे आवाज उठवता यावा यासाठी संवेदनशील आणि जबाबदार सहकार्य संस्कृती निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना न्याय मिळवून देणे आणि कार्यस्थिती सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी नेहमी सदैव कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी नताशा माथुर अप्पर जिल्हाधिकारी शोभा नार्वेकर निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल सिव्हिल सर्जन नागेश लखमवाड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रेशमी खांडेकर प्रकल्प संचालक स्मिता पाटील जिल्हा विधी सेवा सल्लागार डी.जी सूर्यवंशी जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे तसेच राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते आदींची यावेळी उपस्थिती होती.

No comments