adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"शिरपुरात भिमविचारांचा जागर! क्रांतीची मशाल पेटणार; १३५ व्या जयंती महोत्सवाचा ऐतिहासिक संकल्प !"

"शिरपुरात भिमविचारांचा जागर! क्रांतीची मशाल पेटणार; १३५ व्या जयंती महोत्सवाचा ऐतिहासिक संकल्प !"  धुळे/प्रतिनिधी - नरेंद्र रायसिंग...

"शिरपुरात भिमविचारांचा जागर! क्रांतीची मशाल पेटणार; १३५ व्या जयंती महोत्सवाचा ऐतिहासिक संकल्प !" 


धुळे/प्रतिनिधी - नरेंद्र रायसिंग ( अधिकृत पत्रकार ) 
मो. 8999838651  

 [ संपादक  हेमकांत गायकवाड ]

विज निर्मितीचे जनक, बोधिसत्व , क्रांतीची मशाल हाती घेऊन जग बदलणारे महामानव , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती महोत्सवाच्या नियोजनासाठी शिरपूर येथे 'विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव कृती समिती'ची महत्त्वपूर्ण बैठक ही समाजातील वरिष्ठ मान्यवर यांच्या उपस्थित पार पडली.. 
तसेच रविवार, ८ मार्च रोजी झालेल्या या बैठकीत समितीच्या नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदाची धुरा रोशन थोरात यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
शिरपूर शहरातील सर्व भिम सैनिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात निवडी पार पडल्या, समितीच्या उपाध्यक्षपदी गोल्डी साने आणि प्रेम सैदाणे यांची निवड करण्यात आली. तर खजिनदार पदी म्हणून प्रताप देवरे सर आणि कार्याध्यक्ष पदी म्हणून अनिलदादा आखाडे यांची निवड झाली व तसेच नरेंद्र रायसिंग यांची प्रसिद्धी प्रमुख पदी म्हणून, तर पिंटू थोरात व गणेश बाशिंगे यांची सचिव पदी निवड झाली. तसेच या जयंती महोत्सवाची जबाबदारी या नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
   तसेच यावेळी नवनिर्वाचित समितीचे अध्यक्ष रोशन थोरात यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले की, आधुनिक भारताचे बुद्ध महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जयंतीनिमित्त होणाऱ्या सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची अधिकृत घोषणा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव कृती समिती मार्फत लवकरच केली जाणार आहे. आणि " शिरपूरच्या इतिहासात यंदाची 135 वी भीमजयंती महोत्सव हा सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल, असा आमचा नक्कीच प्रयत्न राहील. तसेच या निवडी नंतर शिरपूर व वरवाडे परिसरातील सर्व स्तरांतून फुले-शाहू- आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. व नवनिर्वाचित समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व समाज बांधवांचे आभार मानले..

No comments