वाठार पोलिसांची दमदार कामगिरी, चोरीच्या दुचाकीसह आरोपींच्या आवळल्या मुसक्या! 2,20,000 / रुपयांचा मुद्देमाल हस्तगत! सौ. शुभांगी सरोदे-पुर...
वाठार पोलिसांची दमदार कामगिरी, चोरीच्या दुचाकीसह आरोपींच्या आवळल्या मुसक्या! 2,20,000 / रुपयांचा मुद्देमाल हस्तगत!
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी ( सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
उत्तर कोरेगांव तालुक्यांतील वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी नुकताच पदभार घेतला असून सध्या उत्तर कोरेगांव गावच्या वाठार परिसरांत घरफोड्या इतर चोऱ्या तसेच अवैध धंदेवाल्यांचे देखील चांगलेच धाबे दणाणले आहेत. होळी धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर वाठार पोलीस पेट्रोलिंग करीत असताना वाठार ते बिलकुले रस्त्यावर एक संशयित विना नंबर प्लेटची काळया रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल वरून फिरताना आढळला यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता. सदर मोटरसायकल बाबत माहिती देण्यास त्याने टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले अखेर त्यांनी दुचाकी चोरीची कबुली पोलिसांना दिली. अधिक चौकशी केली असता माझ्या घरी आणखी दोन मोटरसायकली असत्याचेही सांगितले आहे. त्याच्याकडे कोणताही पुरावा नसल्याने मोटरसायकल चोरीच्या असल्याची खात्री झाली. दत्तात्रय धनसिंग पवार (वय 33) रा. बिचुकले ता. कोरेगांव जि. सातारा) असे आरोपींचे नाव आहे. त्यांचेवर वाठार पोलीस ठाण्यात रजिस्टर नंबर 53/20256 मुंबई पोलीस अधिनियम कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींकडून सुमारे एकूण 2,20,000/ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सुशील भोसले पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव पो.हवा. उदय जाधव जितेंद्र शिंदे म.पो.ना. गौरी कदम पो.कॉ प्रशांत गोरे विठ्ठठल काळे प्रथमेश अलगुडे सदर घटनेचा अधिक तपास पो.हवा. जितेंद्र शिंदे करीत आहेत.

No comments