रमजान विशेष हजरत मुहम्मद पैगंबर आणि व्यक्तीपूजा हजरत मुहम्मद पैगंबर (स.) यांना व्यक्तीपूजेचा प्रचंड तिटकारा होता. मानवाने निराकार ईश्वराला...
रमजान विशेष
हजरत मुहम्मद पैगंबर आणि व्यक्तीपूजा
हजरत मुहम्मद पैगंबर (स.) यांना व्यक्तीपूजेचा प्रचंड तिटकारा होता. मानवाने निराकार ईश्वराला कधी विसरू नये. अल्लाहचीच भक्ती करावी म्हणून त्यांनी त्यांच्या हयातीत त्यांचे फोटो, प्रतिमा काढण्यास सक्त मनाई केली होती म्हणून जगात आज पैगंबरांचे चित्र, प्रतिमा कधीच दिसणार नाही. हे जगातील एक आश्चर्यच आहे. हजरत पैगंबरांना आत्मस्तुती अजिबात आवडत नसे. पैगंबर हे खुल्या अंतकरणाचे होते. त्यांच्या शत्रूने सत्कार्य केले तर ते त्याची प्रशंसा करीत. हजरत पैगंबर यांचा हसरा व तेजस्वी चेहरा भव्य कपाळ, हरणासारखे डोळे व गोड आवाज यामुळे प्रत्येक माणसावर त्यांची छाप पडे. आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे असुन आपल्यामध्ये उच्च नीच असा भेद नाही असे त्यांचे मत होते. हजरत पैगंबरांकडे मंडळी जमली की, ते त्यांच्याबरोबर लोककल्याणाची चर्चा करीत त्यांनी गुलामगिरीची पद्धत बंद केली सर्वप्रथम त्यांनी आपल्या गुलामाला गुलामगीरीतून मुक्त केले.
अब्दुल सरदार पटेल
मो. 8766747092

No comments