adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वि.सां.चळवळीच्यावतीने शाहीर संभाजी भगत यांची श्रीरामपूरात सवाद्य मिरवणूक ..

 वि.सां.चळवळीच्यावतीने शाहीर संभाजी भगत यांची श्रीरामपूरात सवाद्य मिरवणूक .. शौकतभाई शेख / श्रीरामपूर: - (संपादक :- हेमकांत गायकवाड) सातारा ...

 वि.सां.चळवळीच्यावतीने शाहीर संभाजी भगत यांची श्रीरामपूरात सवाद्य मिरवणूक ..





शौकतभाई शेख / श्रीरामपूर: -

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


सातारा येथे दिनांक ९ व १० मे २०२६ रोजी संपन्न होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून शाहिर संभाजी भगत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विद्रोही सांस्कृतिक चळवळ श्रीरामपूर च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने सन्मानपत्र,शाल, फेटा, पुष्पहार व बुके देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

डॉ.संजय दुशिंग यांनी मानपत्राचे वाचन केले. अध्यक्षस्थानी शाहीर भिमराव कदम होते. कार्यक्रमास राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. जालिंदर शिंगे,डॉ.सलिम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी फुले शाहु आंबेडकर चळवळीतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी ॲड.अमोल सोनवणे, ॲड.अण्णासाहेब मोहन,विजय जगताप, संतोष त्रिभुवन, रज्जाकभाई शेख सर, सिध्दार्थ दिवे, राजेंद्र हिवाळे, भारत शिंगे, सतिश लोंढे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची अध्यक्ष सुचेना संतोष त्रिभुवन यांनी केली.अनुमोदन विजय जगताप यांनी दिले, प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे जिल्हाध्यक्ष अशोकराव दिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सलिम शेख यांनी केले.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments