adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माहिती अधिकार दिनाकडे दुर्लक्ष तहसील कार्यालयावर कारवाईची टांगती तलवार! विभागीय आयुक्तांचे कडक निर्देश – अहवाल न सादर केल्याने प्रशासन नाराज?

 माहिती अधिकार दिनाकडे दुर्लक्ष तहसील कार्यालयावर कारवाईची टांगती तलवार! विभागीय आयुक्तांचे कडक निर्देश – अहवाल न सादर केल्याने प्रशासन नारा...

 माहिती अधिकार दिनाकडे दुर्लक्ष तहसील कार्यालयावर कारवाईची टांगती तलवार!

विभागीय आयुक्तांचे कडक निर्देश – अहवाल न सादर केल्याने प्रशासन नाराज?  


नाशिक प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नाशिक : शासनाच्या स्पष्ट परिपत्रकानुसार साजरा करावयाचा माहिती अधिकार दिन अंमळनेर तहसील कार्यालयात साजरा न केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणी संबंधित पुरवठा तपासणी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त,नाशिक यांनी दिले आहेत.

या संदर्भात यापूर्वीही अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र संबंधित कार्यालयाकडून अद्यापपर्यंत कोणताही अनुपालन अहवाल सादर न झाल्याने विभागीय पातळीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

पत्रकार हेमकांत बळीराम गायकवाड यांनी १२ जानेवारी २०२६ रोजी लेखी तक्रार करून शासनाच्या आदेशाची पायमल्ली झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत विभागीय कार्यालयाने जिल्हा पुरवठा अधिकारी,जळगाव यांना तात्काळ चौकशी करून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच,केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश बजावले आहे.

शासनाच्या पारदर्शकतेच्या धोरणाचा गाभा असलेल्या माहिती अधिकार दिनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवला जात असून, या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. आता जिल्हा स्तरावर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments