adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे : जळगाव येथे ‘द ग्रँड अवॉर्ड शो’मध्ये सौ. बबीता धनगर यांचा सन्मान

 एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे : जळगाव येथे ‘द ग्रँड अवॉर्ड शो’मध्ये सौ. बबीता धनगर यांचा सन्मान  वर्डी /जळगाव प्रतिनिधी संपादक हेमकांत गायकवाड  ज...

 एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे : जळगाव येथे ‘द ग्रँड अवॉर्ड शो’मध्ये सौ. बबीता धनगर यांचा सन्मान 


वर्डी /जळगाव प्रतिनिधी

संपादक हेमकांत गायकवाड 

जळगाव, दि. १ मार्च २०२६ — महिलांच्या आत्मनिर्भरतेला बळ देण्यासाठी व स्त्री शक्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने श्री शाम इव्हेंट तर्फे ‘द ग्रँड अवॉर्ड शो’ व ‘मेगा ब्युटी ब्रायडल शो’चे आयोजन जळगाव येथे उत्साहात पार पडले. यावेळी ‘लुक अँड लर्न मेकअप सेमिनार’चाही समावेश होता. या भव्य कार्यक्रमात वर्डी येथील माजी सरपंच सौ. बबीता नंदलाल धनगर, यशस्वी ब्युटी पार्लर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल “उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट” व “उत्कृष्ट व्यवसाय” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते देण्यात आला. सौ. धनगर यांनी ग्रामीण भागात राहून स्वतःचा व्यवसाय उभा करत अनेक महिलांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या परिश्रम, चिकाटी आणि गुणवत्तापूर्ण सेवेमुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला. कार्यक्रमावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. या सन्मानाबद्दल सौ. बबीता धनगर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या यशामुळे इतर महिलांनाही आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग मिळत आहे.

No comments