adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

“स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून दरोडा..तब्बल १५ लाखांची लूट..स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद..!

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून दरोडा..तब्बल १५ लाखांची लूट..स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद..!  सचिन मोकळं अह...

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून दरोडा..तब्बल १५ लाखांची लूट..स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद..! 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-  “स्वस्तामध्ये सोने देतो” अशी गोड बोलणी करत विश्वास संपादन करून नेवासा परिसरात थरारक दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत आरोपींकडून तब्बल ६,६५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आली आहेत. या प्रकरणी फिर्यादी अरविंद सिद्धप्पा हलसांगी (रा. गणेशनगर, वाघोली, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 163/2026, भारतीय न्याय संहिता 2023 कलम 310(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता शेखर उर्फ बंट्टी संजय पाडळे (रा. देवगाव, ता. नेवासा) याने फिर्यादींना “स्वस्तात सोने देतो” असे आमिष दाखवत विश्वासात घेतले. त्यानंतर किरण बंडू काळे (रा. नागफनीवस्ती, नेवासा) तसेच इतर ८ ते १० साथीदारांनी संगनमत करून फिर्यादी व त्यांचे मित्र आदित्य नागटिळे व अशोक शहाणे यांना श्रीरामपूर रोडवरील हॉटेल शिवमजवळील कच्च्या रस्त्याने कांद्याच्या चाळीत बोलावले. 

तेथे आरोपींनी काठी, धारदार शस्त्र व पिस्तुलाचा धाक दाखवत फिर्यादी व त्यांच्या मित्रांना मारहाण केली. फिर्यादींकडील रोख रक्कम, ऍपल कंपनीचा मोबाईल, तसेच मित्रांकडील दोन विवो मोबाईल आणि दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण १५,६५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून आरोपी पसार झाले.

घटनेची गंभीर दखल घेत सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे नेवासा–माळी चिंचोरा फाटा परिसरात सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपली नावे, शेखर उर्फ बंट्टी संजय पाडळे (वय ३२), किरण बंडू काळे (वय २९) अशी सांगितली.गुन्ह्याची कबुली; इतर साथीदारांचा शोध सुरू

सखोल चौकशीत शेखर पाडळे याने गुन्ह्याची कबुली देत भाऊसाहेब छगन भोसले (रा. नेवासा फाटा), सचिन उर्फ गटण्या पवार (रा. खळवाडी, नेवासा खुर्द) तसेच ८ ते ९ अनोळखी साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे सांगितले. आरोपींच्या ताब्यातून ३५,००० रुपये किमतीचा गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, ३०,००० रुपये किमतीचा मोबाईल व ६,००,००० रुपये रोख रक्कम असा एकूण ६,६५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी किरण बंडू काळे याच्याविरुद्ध नेवासा, राहाता, कोपरगाव, एमआयडीसी (अहिल्यानगर) तसेच गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे खून, दरोडा, घरफोडी, आर्म ऍक्ट आणि मोक्का अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपींना पुढील तपासासाठी नेवासा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

No comments