कर्जाणे गावात आदिवासी पारंपारिक भोंगर्या सणाचा उत्साहात समारोप चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) कर्जाणे:- आदिवासी समाजाचा प...
कर्जाणे गावात आदिवासी पारंपारिक भोंगर्या सणाचा उत्साहात समारोप
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कर्जाणे:- आदिवासी समाजाचा पारंपारिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारा भोंगर्या सण आठवडाभर विविध कार्यक्रमांनी साजरा झाल्यानंतर कर्जाणे गावात उत्साहात समारोप करण्यात आला. सातपुडा परिसरातील पाड्यांमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत पारंपारिक वेशभूषा धारण करून ढोल-ताशांच्या गजरात नृत्य सादर केले.
या समारोप सोहळ्यात तरुणाई, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी पारंपारिक पोशाख परिधान करून आपली संस्कृती जपण्याचा संदेश दिला. ढोल, मांदळ आणि पारंपारिक वाद्यांच्या तालावर नाचत-गात गावातून मिरवणूक काढण्यात आली. सातपुडा गावातील पाड्यांमधील लोकांनी एकत्र येऊन सणाची परंपरा पुढील पिढीपर्यंत टिकवून ठेवण्याचा संकल्प केला.
समारोप कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यामुळे कर्जाणे गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. उपसरपंच प्रमोद बारेला, बबलू बारेला, सुरेश बारेला, सतीश बारेला,धरमसिंग बारेला,पाटील,गिलदार बारेला पाटील नावाड, शुभराम बारेला वरती, जगदीश बारेला गाव वरती, प्रधान बारेला पूजरा व ग्रामस्थ होते
आधुनिकतेच्या काळातही आपली ओळख आणि संस्कृती जपणे आवश्यक आहे. भोंगर्या सण हा केवळ आनंदाचा उत्सव नसून तो सामाजिक एकता, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे.प्रमोद बारेला उपसरपंच कर्जाणे


No comments