adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथे धुलीवंदन उत्साहात साजरे; आमदार अमोल दादा जावळे यांचा उत्स्फूर्त सहभाग

 यावल येथे धुलीवंदन उत्साहात साजरे; आमदार अमोल दादा जावळे यांचा उत्स्फूर्त सहभाग  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  यावल शहरातील T...

 यावल येथे धुलीवंदन उत्साहात साजरे; आमदार अमोल दादा जावळे यांचा उत्स्फूर्त सहभाग 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल शहरातील The Best Friend Group व R K Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू सम्राट मॉल परिसरात धुलीवंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.

सालाबादप्रमाणे यंदाही विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दिमाखात पार पडला. वाद्यांच्या तालावर तरुण युवक व बालमित्र मंडळ रंगून गेले होते. रंगांची उधळण, जल्लोष आणि उत्साह यामुळे संपूर्ण परिसर आनंदमय वातावरणाने भारावून गेला होता.

कार्यक्रमास यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल दादा जावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी सुमारे एक तास तरुणांसोबत धुलीवंदन साजरे करत उत्सवात सहभाग नोंदवला. उत्साहाच्या भरात त्यांनी युवकांसोबत नृत्यही केले. यावेळी उपस्थित युवकांनी त्यांच्यासोबत छायाचित्रे काढत आनंद व्यक्त केला. 


या कार्यक्रमासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, डॉ. कुंदन फेगडे, नगरसेवक उमेश फेगडे, बाळासाहेब फेगडे, योगेश चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, आकाश चोपडे, रुबाब तडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, रोशन येवले, डॉ. धीरज चौधरी, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष अतुल दादा भालेराव, गणेश महाजन, भूषण फेगडे, रितेश बारी, उज्ज्वल कानडे, चेतन आढळकर, सरपंच परिषदेचे संदीप भैय्या सोनवणे, विलास चौधरी, चेतन फेगडे, प्रशांत रणधिरे, अभय शेठ जंगले, आशिष पाटील, सर दिलीप वाणी, समाधान राजपूत, संजय फेगडे, गणेश येवले, जुगल पाटील, रमेश जोगी, मयूर कानडे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments