adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एमआयडीसी हद्दीत उसने दिलेल्या पैशावरून तरुणास बेदम मारहाण.. एमआयडीसीतील वाढती गुन्हेगारी पुन्हा चर्चेत…

  एमआयडीसी हद्दीत उसने दिलेल्या पैशावरून तरुणास बेदम मारहाण.. एमआयडीसीतील वाढती गुन्हेगारी पुन्हा चर्चेत…  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:-...

 एमआयडीसी हद्दीत उसने दिलेल्या पैशावरून तरुणास बेदम मारहाण.. एमआयडीसीतील वाढती गुन्हेगारी पुन्हा चर्चेत… 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:- एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला पैशांच्या कारणावरून बेदम मारहाण करण्यात आल्याने त्या परिसरात खळबळ उडाली आहे.विजय विकास सोनवणे हा तरुण आपल्या मित्राकडे दिलेले उसने पैसे परत मागण्यासाठी गेला होता.पैशांवरून वाद निर्माण झाला.संतापलेल्या आरोपींनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला.प्लास्टिक पाईप व दांड्याने मारहाण करत त्यास गंभीर जखमी केले.आणि “पुन्हा पैसे मागायला आलास तर जिवे मारू,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे या प्रकरणी नंदू पावलेस सोनवणे,विवेक नंदू सोनवणे,कविता नंदू सोनवणे,छाया सतीश सोनवणे

यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एमआयडीसी पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे भरवस्तीत भीतीचे वातावरण पसरले असून,पैशांच्या वादातून वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

No comments