adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वनोली साईबाबा मंदिर सभा मंडपाच्या दोन कोटीच्या कामाचे आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते भूमिपूजन ट्रस्ट अध्यक्ष हिरा भाऊंच्या प्रयत्नाला यश

 वनोली साईबाबा मंदिर सभा मंडपाच्या दोन कोटीच्या कामाचे आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते भूमिपूजन ट्रस्ट अध्यक्ष हिरा भाऊंच्या प्रयत्नाला यश भर...

 वनोली साईबाबा मंदिर सभा मंडपाच्या दोन कोटीच्या कामाचे आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते भूमिपूजन ट्रस्ट अध्यक्ष हिरा भाऊंच्या प्रयत्नाला यश


भरत कोळी यावल 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल:- तालुक्यातील श्री क्षेत्र वनोली साईबाबा मंदिर या मंदिरासाठी मागील सरकारच्या कालखंडात नामदार गिरीश भाऊ महाजन हे पर्यटन विकास मंत्री असताना आमदार अमोल हरिभाऊ जावळे व श्री वनोली साईबाबा मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष हिरालाल भाऊ चौधरी यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी सभा मंडपासाठी दोन कोटी रुपयाचे निधी मंजूर करण्यात आला होता या सभा मंडपाची भूमिपूजन यावल रावेर तालुक्याची आमदार अमोल हरिभाऊ जावळे  यांच्या हस्ते दिनांक 3 मार्च 26 मंगळवार रोजी संध्याकाळी विधिवत पूजा करून कुदळ मारण्यात आली. या मंदिरासाठी व परिसराच्या विकासासाठी स्वर्गीय आमदार हरिभाऊ जावळे यांच्या माध्यमातून या ट्रस्टचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल भाऊ चौधरी यांच्या प्रयत्नाने करोडो रुपयाचे काम या परिसरात करण्यात आली आहेझालेली कामे ही त्या गोष्टीला साक्षीदार ही आहेत. श्री साईबाबा मंदिर वनोली येथील नवरात्र उत्सवामध्ये अष्टमीच्या दिवशी पावसाळ्याचे शेवटच्या चरणात भंडाऱ्याचा कार्यक्रम हा खूप मोठा असतो या ठिकाणी महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात नेमका यावेळी पाऊस असतो या पावसामध्ये भाविकांची गर्दी होते व गाव छोटे मात्र भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात त्यामुळे भाविकांची पावसामुळे गैरसोय होते याचा विचार करून ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल भाऊ चौधरी यांच्या पाठपुराव्याने नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या कडून सदर ठिकाणी सभामंडप व्हावा यासाठी प्रयत्न केले गेले .त्यामुळे त्यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आता या कामाला प्रत्यक्ष आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते कुदळ मारून सुरुवात झाली 

याप्रसंगी बाजार समितीचे संचालक योगेश ब ऱ्हाटे उमेश पाटील यांच्यासह भुसावळ येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद शेठ नेमाडे व वनोलीसाईबाबा मंदिर ट्रस्टीचे संचालक बळीराम चौधरी बाबू कोळी पुंडलिक पाटील पंडित चौधरी विश्वनाथ पाटील सदाशिव पाटील यांच्यासह विलास चौधरी चुडामण चौधरी गंभीर चौधरी सोपान पाटील बाळू पाटील राजू कोळी लोटू पाटील रूपसिंग चौधरी वसंत कोळी सुनील कोळी रमेश पदमे पुरुषोत्तम चौधरी भगवान चौधरी परीक्षीत चौधरी देविदास पाटील भागवत पाटील गरुड चौधरी रमाकांत चौधरी घनश्याम पाटील दीपक कोळी प्रकाश चौधरी जीवन चौधरी गंभीर चौधरी बापू चौधरी यांच्यासह वनोली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . सदरचे काम यावर्षी नवरात्र उत्सवाच्या आधी पूर्ण होईल अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली .सदरचे काम पूर्ण झाल्यास या ठिकाणी पावसाळ्यात भाविकांची घाण होणार नाही नव्हे तर गाव छोट असल्यामुळे या ठिकाणी लग्न समारंभासाठी सुद्धा हा सभा मंडप कामा येईल .आणि गावातील गैरसोय दूर होईल .

No comments