adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निंभोरा पोस्टेच्या सपोनि मीरा देशमुख व पोलिसांचा सन्मान. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

 निंभोरा पोस्टेच्या सपोनि मीरा देशमुख व पोलिसांचा सन्मान. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान   रावेर प्रतिनिध...

 निंभोरा पोस्टेच्या सपोनि मीरा देशमुख व पोलिसांचा सन्मान.

पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील निंभोरा पोलीस ठाण्याच्या महिला सपोनी मीरा  देशमुख यांनी व पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे तसेच हे का अविनाश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे, किरण जाधव व पोलिसांनी वडगाव येथील चोरी गेलेले डिझेल जनरेटर 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे चोरी करणाऱ्या  चोरट्यास  फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सापडा रचून शिताफिने अटक करून जनरेटर हस्तगत केले म्हणून  जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी  यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन निंभोरा पोलीस ठाण्याच्या सपोनी मीरा देशमुख व पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे व अविनाश पाटील, सुभाष शिंदे, किरण जाधव पोलिसांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला यावेळी जिल्हा पोलीस अप्पर अधीक्षक अशोक नखाते, हे देखील उपस्थितीत होते. निंभोरा पोलीस ठाण्याच्या सपोनी देशमुख त्याचबरोबर त्यांचे सहकारी उल्लेखनीय कार्य करीत असल्याने त्यांचा सन्मान  जळगाव येथे करण्यात आला आहे..निंभोरा पोलिसांचा सन्मान  झाल्याबद्दल शांतता कमिटी सदस्य, पत्रकार व परिसरातील मान्यवर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे 

No comments