adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोरेगांवच्या महिला पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे अखेर निलंबित:- पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा आदेश!

 कोरेगांवच्या महिला पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे अखेर निलंबित:- पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा आदेश!   सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी ( सातार...

 कोरेगांवच्या महिला पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे अखेर निलंबित:- पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा आदेश! 


 सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 कोरेगांव पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक  दीपिका मुसळे यांच्यावर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी नुकताच निलंबनाचा आदेश जारी केला आहे. दीपिका मुसळे या कोरेगांव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत गेल्या वर्षभरांपासून विविध कारणाने त्या चांगल्याच चर्चेत होत्या. तसेच त्यांच्या कामकाजावर राजकीय आरोप-प्रत्यारोप निर्माण झाले होते. पोलीस ठाण्यावर मोर्चे धोरणे ठिय्या आंदोलने झाली होती या काळात कधी नव्हे तर कोरेगाव पोलीस ठाण्याची तब्बल तीन वेळा तपासणी झाली आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर  विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस महासंचालक नवल बजाच यांच्या तपासणीचा समावेश असूनही आणि त्या पोलिस ठाण्यातील एकमेव महिला पोलीस उपनिरीक्षक असतानाही यांच्याकडे तपासणीसाठी असलेल्या अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहणे, वारंवार गैरहजर राहणे, वैद्यकीय रजेवर जाणे आदीं अनेक कारणे नमूद करत. कोरेगांव पोलीस ठाणे आणि कोरेगांव उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयांच्या अधिकाऱ्याकडून कसुरी अहवाल आल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

No comments