adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ड्युटीवर असलेल्या होमगार्डवर हल्ला..परीक्षा केंद्राबाहेर दादागिरी..पेपर सुटल्यानंतर पाहून घेतो धमकी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 ड्युटीवर असलेल्या होमगार्डवर हल्ला..परीक्षा केंद्राबाहेर दादागिरी..पेपर सुटल्यानंतर पाहून घेतो धमकी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  सचिन म...

 ड्युटीवर असलेल्या होमगार्डवर हल्ला..परीक्षा केंद्राबाहेर दादागिरी..पेपर सुटल्यानंतर पाहून घेतो धमकी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-भिंगार परिसरातील परीक्षेच्या बंदोबस्ता दरम्यान ड्युटीवर असलेल्या होमगार्डवरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेमुळे परीक्षाकेंद्र परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,संबंधित चार आरोपीं विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महंमद गुफरान सादत गौडा (वय ३५, रा. मुलांनगल्ली, भिंगार) हे गेल्या सुमारे १४ वर्षांपासून अहिल्यानगर समादेशक (होमगार्ड) येथे कार्यरत आहेत. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर त्यांची भिंगार हायस्कूल येथे बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती.दि.१६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून ते युनिफॉर्ममध्ये ड्युटीवर होते. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास आयान इमरान खान, गुफरान अली फैज अहमद मकंदर,हुजेफा अलीम शेख आणि रेहान अमजद शेख हे चौघे मोटारसायकलवरून शाळेजवळ आले.ते विनाकारण थांबल्याने तेथील शिक्षकांनी त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले.

यानंतर होमगार्ड गुफरान गौडा यांनी संबंधितांना शाळेच्या गेटबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता,चौघांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. आरोपींनी त्यांची गचांडी पकडून तोंडावर चापट मारली तसेच धक्काबुक्की करत मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता “पेपर सुटल्यावर तुझ्याकडे पाहून घेतो” अशी उघड धमकीही दिली.या गोंधळात गुफरान गौडा यांनी रेहान शेख याला पकडून ठेवले, तर इतर तिघे गेटबाहेर उभे होते. तत्काळ त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गव्हाणे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल लहारे व खेडकर घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.यानंतर होमगार्ड गुफरान गौडा यांनी चारही आरोपींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे.परीक्षेसारख्या संवेदनशील काळातच सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला होणे ही गंभीर बाब मानली जात असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

No comments