adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कर्तव्यदक्ष महिला अधिकारी क्रांती पाटील यांची मुरगूड पोलीस ठाण्यात एंट्री; कायदा-सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणार !

 कर्तव्यदक्ष महिला अधिकारी क्रांती पाटील यांची मुरगूड पोलीस ठाण्यात एंट्री; कायदा-सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणार !  (कोल्हापूर जिल्हा) स...

 कर्तव्यदक्ष महिला अधिकारी क्रांती पाटील यांची मुरगूड पोलीस ठाण्यात एंट्री; कायदा-सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणार ! 


(कोल्हापूर जिल्हा) संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मागील दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील मोठी खांदेपालट झाली असून. कालावधी आणि तळ ठोकून असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी नुकतेच दिले होते. यामध्ये मुरगूड पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी कोरे यांच्याही बदलीचा समावेश होता. कोरे यांची बदली करवीर पोलीस ठाण्यात दुय्यम अधिकारी म्हणून झाली आहे. मुरगूड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून क्रांती पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांच्या नियुक्तीमुळे परिसरांत कायदा व सुव्यवस्थेला अधिक बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्रांती पाटील या कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व जनतेशी संवाद साधणाऱ्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांनी विविध ठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावत गुन्हेगारी नियंत्रण, महिला सुरक्षा तसेच सामाजिक प्रश्नांवर प्रभावी काम केले आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की, “मुरगूड परिसरांत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, गुन्हेगारीवर नियंत्रण आणणे आणि नागरिकांचा पोलीस प्रशासनावर विश्वास अधिक दृढ करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट असेल. ”तसेच, नागरिकांनी कोणतीही समस्या किंवा तक्रार निःसंकोचपणे पोलीस ठाण्यात मांडावी, असे आवाहनही त्यांनी केले. स्थानिक नागरिक व व्यापारी वर्गाने त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करत, त्यांच्या कार्यकाळात मुरगूड परिसर अधिक सुरक्षित व शांततामय बनेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मुरगूड पोलीस ठाण्याला दुसऱ्यांदा महिला अधिकारी लाभल्या आहेत.

No comments