अहिल्यानगर मध्ये गुंडाराज.. कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला बेदम मारहाण ‘बिहारपेक्षा भयावह’ स्थितीचा आरोप..गुंडांच्या धाडसामुळे कायदा-सुव्यवस्...
अहिल्यानगर मध्ये गुंडाराज.. कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला बेदम मारहाण ‘बिहारपेक्षा भयावह’ स्थितीचा आरोप..गुंडांच्या धाडसामुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीने आता कळस गाठल्याचे चित्र दिसून येत असून,राहुरी परिसरात कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरच गुंडांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास रंगनाथ वैराळ हे एका दुर्दैवी घटनेच्या ठिकाणाहून परतत असताना वाटेत काही इसम एका वाहनचालकास मारहाण करत असल्याचे दिसून आले.त्यावेळी त्यांनी कर्तव्याच्या भावनेतून हस्तक्षेप करत आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला.मात्र संतप्त गुंडांनी पोलिस असल्याचे माहित असूनही त्यांच्यावरच अचानक हल्ला चढवला.या हल्ल्यात आरोपींनी लोखंडी गजाने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.इतकेच नव्हे तर जीव घेण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान,या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हाभरातून संतापाची लाट उसळली आहे.काही दिवसांतच एका पोलिसावर गोळीबार आणि जीवघेण्या हल्ल्यांसारख्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जिल्हा पोलिस प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे संकेत देण्यात आले आहेत.

No comments