स्वातंत्र्य, सन्मान आणि समानसंधी ही स्त्री सक्षमीकरणाची त्रिसुत्री: स्वाती बलखंडे मार्गदर्शन करतांना सौ. स्वाती बलखंडे तथा विचारपीठावर मान...
स्वातंत्र्य, सन्मान आणि समानसंधी ही स्त्री सक्षमीकरणाची त्रिसुत्री: स्वाती बलखंडे 
मार्गदर्शन करतांना सौ. स्वाती बलखंडे तथा
विचारपीठावर मान्यवर
पारोळा प्रतिनिधी
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला जगभरात साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी तसेच लैंगिक समानता व हक्कांसाठी जनजागृती करण्याचा महत्त्वाचा दिवस असुन स्वातंत्र्य, सन्मान आणि समानसंधी हे महिला सक्षमीकरणाची त्रिसुत्री असल्याचे मत पारोळा येथील बालाजी विदयालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती बलखंडे यांनी व्यक्त केले. पारोळा येथील किसान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला दिन आणि क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित साडी डे उपक्रमाप्रसंगी उदघाटक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विद्यार्थी विकास विभागाच्या महिला अधिकारी डॉ. अनिता मुडावदकर होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. प्रतिभा निकुंभे, प्रा. आशा बोरसे, प्रा. कोयल पाटील, प्रा. मृणाल पवार होत्या. प्रास्ताविक प्रा. मृणाल पवार यांनी मांडले. शुभांगी पाटील आणि प्रेरणा भालेराव या विद्यार्थीनींनी महिला दिनविशेष बाबत माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतातून डॉ.अनिता मुडावदकर यांनी पुरातन ते आधुनिक काळापर्यंत राष्ट्राच्या सर्वांगीण विकासात स्त्रीशक्तीचे असलेले योगदान आणि महत्त्व यावर विचारमंथन केले तर प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करतांना प्रा. कल्पना निकुंभे यांनी राजमाता जिजाऊंच्या तर प्रा. कोयल पाटील यांनी क्रांतिज्योत सावित्रीबाई फुलेंच्या जीवनापटावर थोडक्यात प्रकाश टाकला. आधुनिक काळातील सुविधाचा योग्य तो वापर करत सामाजिक बांधिलकीतून समाजातील वाईट प्रथांच्या विरोधात आजच्या तरूणीने खंबीरपणे उभे ठाकण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रा. आशा बोरसे यांनी व्यक्त केले. सुत्रसंचालन शितल चौधरी तर आभार प्रेरणा भालेराव या विद्यार्थीनी मांडलेत. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
No comments