लासुर येथे अखिल विश्व गायत्री परिवारातर्फे श्री क्षेत्र रामेश्वर तापीकाठ दिंडीचे भव्य स्वागत लासुर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) च...
लासुर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील श्री क्षेत्र नाटेश्वर लासुर या पावन भूमीत आज दि. १० रोजी अखिल विश्व गायत्री परिवारातर्फे श्री क्षेत्र बलवाडी ते श्री क्षेत्र रामेश्वर तापीकाठ जाणाऱ्या दिंडीचे लासुर गावात मोठ्या उत्साहात वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.
दिंडीचे आगमन होताच संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यावेळी गावातून पारंपरिक पद्धतीने भव्य कलशयात्रा काढण्यात आली. ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते.
यानंतर लासुर येथील श्रीराम मंदिरात गायत्री दीप यज्ञ तसेच धार्मिक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. या प्रवचनाचा लाभ लासुर गावातील महिला, युवक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घेतला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने लासुर ग्रामस्थांचे मनापासून स्वागत करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण गावात भक्तीमय व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

No comments