adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा : स्वातीताई देशमुख-खर्चे यांचा संदेश

 जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा : स्वातीताई देशमुख-खर्चे यांचा संदेश  ८ मार्च हा दिवस जगभर जागतिक महिला दिन म्हणून साजर...

 जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा : स्वातीताई देशमुख-खर्चे यांचा संदेश 


८ मार्च हा दिवस जगभर जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने समाजसेविका स्वातीताई (देशमुख) खर्चे यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा अर्पण केला.

त्या म्हणाल्या की, स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नसून संपूर्ण समाजाला दिशा देणारी शक्ती आहे. घराला घरपण देणारी, संस्कारांची जोपासना करणारी आणि प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी स्त्री समाजाच्या प्रगतीची खरी प्रेरणा आहे. आयुष्याच्या प्रत्येक चढ-उतारात खंबीरपणे उभी राहून कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी महिला सातत्याने योगदान देत असतात.

स्त्री म्हणजे केवळ सहनशीलतेचे प्रतीक नाही, तर ती सहनशक्ती, जिद्द आणि पराक्रमाची मूर्ती आहे. संकटांना सामोरे जात आत्मविश्वासाने मार्ग काढणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाने जगाला प्रेरणा देणाऱ्या सर्व रणरागिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, असा संदेश स्वातीताई (देशमुख) खर्चे यांनी दिला.

No comments