adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेती प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारा हा आभासी अर्थसंकल्प असून शेतकरी व शेती संकटाकडे नेणारा असा आहे ...एस बी नाना पाटील (समन्वयक,शेतकरी कृती समिती,चोपडा)

  शेती प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारा हा आभासी अर्थसंकल्प असून शेतकरी व शेती संकटाकडे नेणारा असा आहे ...एस बी नाना पाटील (समन्वयक,शेतक...

 शेती प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारा हा आभासी अर्थसंकल्प असून शेतकरी व शेती संकटाकडे नेणारा असा आहे ...एस बी नाना पाटील (समन्वयक,शेतकरी कृती समिती,चोपडा)



" अटी शर्थींची दोन लाखापर्यंत कर्जमाफी घोषणा वगळता,आत्मा काढून टाकलेली खरीप पिक विमा चे ट्रिगर पुनर्स्थापित व बाजारभाव नुकसान  भरून काढणे या सारख्या मुख्य प्रश्नांवर मौन बाळगून शेती प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारा हा आभासी अर्थसंकल्प असून शेतकरी व शेती संकटाकडे नेणारा असा आहे ...एस बी नाना पाटील (समन्वयक,शेतकरी कृती समिती,चोपडा)

..... 

     जसे नरेंद्रजीच २०२२चे शेती उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्नाने  प्रत्यक्षात शेतीचा उत्पादन खर्च दुप्पट केला, तसे देवेन्द्रजी यांचे  आजची ५०ट्रिलियन कृषी अर्थव्यवस्था ही २०४७ मध्ये ५००ट्रिलियन होईल हे स्वप्न म्हणजे नाही झाली तर काय? उत्तर द्यायला हे सरकार थोडीच असेल?

     रासायनिक खते,बियाणे, डिझेल,मजुरी साऱ्यांचे दर वाढत आहेत,संशोधन नसल्याने उत्पादन कमी असे वास्तव असताना शेतीचा उत्पादन खर्च AI ने कमी करू हे म्हणजे शेतकऱ्यांना  सरळ सरळ वाऱ्यावर सोडल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

    नैसर्गिक शेती बाबत घोषणा आहे पण कसे?याची कोणतीही माहिती दिली नाही. 

  एकंदरीत राजकीय घोषणा वगळता प्रत्यक्ष सुधारणा कडे दुर्लक्षित असा अर्थसंकल्प.

No comments