अहिल्यानगर जिल्हा हादरला..स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकावर जमावाकडून हल्ला..भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलीस जखमी सचिन मोक...
अहिल्यानगर जिल्हा हादरला..स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकावर जमावाकडून हल्ला..भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलीस जखमी
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकावर दगडफेक करून कामात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना नगर–सोलापूर रोडवरील तुकडओढा येथे घडली. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांवरच जमावाने हल्ला केल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटने प्रकरणी कॅम्प पोलीस स्टेशन, भिंगार येथे ३१ नामचिन आरोपींसह ७० ते ८० जणांच्या जमावावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस कॉन्स्टेबल सुनील रमेश मालणकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परिसरात गस्त घालत असताना आरोपी योगेश पंडित बेरड याने मोटारसायकल आडवी लावून पोलिसांच्या वाहनाचा मार्ग अडवला.त्यानंतर दीपक उर्फ खेकडा बेरड, देविदास बेरड, राजू बेरड, मयूर पुंड आणि धर्मा बेरड यांनी इतर साथीदारांना बोलावून घेत मोठा जमाव तयार केला.
देवरवाडी येथील गणेश शिंदे, दीपक उर्फ खेकडा बेरड, राहुल कराडे यांच्यासह जमावाने पोलिसांना घेराव घालत अश्लील शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर अचानक दगडफेक करत पोलिसांवर हल्ला चढवण्यात आला.या हल्ल्यात फिर्यादी सुनील मालणकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये,अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे आणि भगवान धुळे हे जखमी झाले आहेत. तसेच शासकीय वाहनाचेही नुकसान झाले आहे. हल्लेखोरांनी पोलिसांना पुढील तपास करण्यापासून रोखण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ३२४(४) आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार करत आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांवरच हल्ला झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

No comments