सातारा जिल्ह्यात निवडणूक काळात मंत्री, सर्वसामान्य सुरक्षित नाही तर पोलीस अधीक्षकांची बदली करा मागणी संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) ...
सातारा जिल्ह्यात निवडणूक काळात मंत्री, सर्वसामान्य सुरक्षित नाही तर पोलीस अधीक्षकांची बदली करा मागणी
संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यात निवडणूक काळात मंत्री तसेच सर्वसामान्य सुरक्षित नसतील तर पोलीस अधीक्षकांची बदली करा अशी मागणी आता शिवसेनेच्या नेत्यांकडून चांगलीच होत आहे. मार्च 2026 मधील आगामी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा तसेच त्यांच्या तात्काळ बदलीची देखील मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून चांगलीच होत होती. या प्रकरणात काही दिवस जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे रजेवर गेले होते. मात्र अजूनही जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बदली बाबत राजकीय नेत्यांकडून चांगल्याच हालचाली सुरू आहेत. सातारा जिल्हा परिषद झालेल्या गदारोळानंतर विधानपरिषद आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. जिल्हा परिषद निवडणूक झालेल्या राडा, मंत्री शंभूराज देसाईंना धक्काबुक्की आणि पोलीस बंदोबस्तातील अपयशी व बाबी कारणीभूत मानल्या जात होत्या. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी या घटनेची गंभीर दखल घेवुन थेट पोलीस अधीक्षक यांच्यावर कारवाईची मागणी आणि बदलीची मागणी केली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक कालावधी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्की मध्ये जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण अजूनही चांगलेच तापले आहे. त्यामुळे सातारकर म्हणत आहेत मंत्री सुरक्षित नाही तर सर्वसामान्य कशावरून सुरक्षित आहेत. यामुळे सातारकरांतून सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाबाबत चांगलंच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य म्हणजे यामध्ये पोलीस अधीक्षकांच्या बदलीची मागणी राजकीय पक्षांतून थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे पोलीस अधीक्षकांच्या बदलीबाबत अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या काही दिवसांत सातारकरांना नव्या पोलीस अधीक्षकांची अपेक्षा दिसून येत आहे. सध्या सातारा पोलीस अधीक्षक म्हणून नंदकुमार ठाकूर यांचे नाव चांगलेच फिल्डवर दिसून येत आहे. त्यामुळे आता पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली होणार की नाही? याकडे आता सातारकरांचे लक्ष लागून आहे.
No comments