adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वृक्षतोडीवर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र होणार – भीम आर्मीचा इशारा..

  वृक्षतोडीवर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र होणार – भीम आर्मीचा इशारा.. यावल (प्रतिनिधी) (संपादक :- हेमकांत गायकवाड) यावल पूर्व वनपरिक्षेत्र...

 वृक्षतोडीवर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र होणार – भीम आर्मीचा इशारा..



यावल (प्रतिनिधी)

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


यावल पूर्व वनपरिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीच्या प्रकारांविरोधात आता नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात भीम आर्मी भारत एकता मिशनने आक्रमक भूमिका घेतली आहे.

भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, यावल पूर्व यांना निवेदन सादर केले. वारंवार तक्रारी करूनही संबंधितांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच अवैध वृक्षतोड वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय, यावल पूर्व समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनासाठी आवश्यक परवानगीची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, वेळेत कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा भीम आर्मीच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

No comments