दरोडा गुन्हयातील फरार आरोपीसह गावठी कट्टा सह आरोपींच्या आवळल्या मुसक्या, स.पो.नि. योगिता नारखेडे यांची दमदार कामगिरी! सौ. शुभांगी सरोदे प...
दरोडा गुन्हयातील फरार आरोपीसह गावठी कट्टा सह आरोपींच्या आवळल्या मुसक्या, स.पो.नि. योगिता नारखेडे यांची दमदार कामगिरी!
सौ. शुभांगी सरोदे पुरीगोसावी (जळगांव जिल्हा) प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये फरार असणाऱ्या आरोपींच्या नशिराबाद पोलिसांनी गावठी कट्टासह आरोपीस अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशावरून नशिराबाद पोलीस स्टेशनचे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवित असतांना स.पो.नि. योगिता नारखेडे यांना मिळालेल्या गुप्त माहितींच्या नशिराबाद गावात बस स्टॅण्ड परीसरांत भुसावळ शहर पोलीस स्टेशन कडील गु.र.न 288/2025 भा.न्या.सं. कलम 311,312 सह शस्त्र अधिनियम कलम 3/25 प्रमाणे दाखल गुन्हयातील फरार आरोपी नामे चेतन सुर्यभान पाटील हा कट्टा घेवुन दहशत माजवित फिरत आहे, त्यावरुन मा. सपोनि नारखेडे यांनी सफौ/1490 राजेश मेंढे, पोहेकॉ/2714 कमलाकर बागुल, पोकॉ/346 भरत बाविस्कर, पोकॉ/476 पंकज सोनवणे, पोकॉ/268 भुषण पाटील, पोकों/211 विजय अहिरे, अश्यांना सदर इसमावर कारवाई करणेबाबत आदेशित केल्याने त्यांनी सदर इसमावर अचानक छापा टाकुन त्यांस 20.20 वाजता जागीच पकडले. त्याचे ताब्यातुन एक लोखंडी चंदेरी रंगाचा काळ्या रंगाची प्लास्टीक ची मुठ असलेला गावठी कट्टा तसेच एक डमी गावठी कट्टा जप्त करुन आरोपी नामे चेतन सुर्यभान पाटील (वय 18) रा. वरची अंळी, नशिराबाद ता.जि. जळगांव) यांस ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द नशिराबाद पोलीस स्टेशन येथे गु.र.न.93/2026 शस्त्र अधिनियम कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढिल तपास पोहेकॉ/2096 प्रशांत विरणारे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग केदार ब्रारबोले यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहायक पोलीस निरिक्षक श्रीमती योगिता नारखेडे यांचे पृथकातील अंमलदार सफी/1490 राजेश मेंढे, पोहेकों/2714 कमलाकर बागुल, पोकॉ/346 भरत बाविस्कर, पोकॉ/476 पंकज सोनवणे, पोकॉ/268 भुषण पाटील, पोकॉ/211 विजय अहिरे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला..

No comments