adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिष्यवृत्ती सराव परीक्षा फेब्रुवारी २०२६ : जि. प. उच्च प्राथमिक शाळा विटनेर जिल्ह्यात पाचव्या क्रमांकावर; घोडगाव केंद्राला तिसरा मानांकित क्रमांक

 शिष्यवृत्ती सराव परीक्षा फेब्रुवारी २०२६ : जि. प. उच्च प्राथमिक शाळा विटनेर जिल्ह्यात पाचव्या क्रमांकावर; घोडगाव केंद्राला तिसरा मानांकित क...

 शिष्यवृत्ती सराव परीक्षा फेब्रुवारी २०२६ : जि. प. उच्च प्राथमिक शाळा विटनेर जिल्ह्यात पाचव्या क्रमांकावर; घोडगाव केंद्राला तिसरा मानांकित क्रमांक  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-  हेमकांत गायकवाड)

फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या जिल्हास्तरीय निकालात उल्लेखनीय यश संपादन करत जि. प. उच्च प्राथमिक शाळा विटनेरने जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शंभर टक्के निकालाची नोंद केली. या सराव परीक्षेत विटनेर शाळेतील तीन विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि तिघेही उत्तीर्ण झाले. सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हे यश शक्य झाले असल्याची भावना मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी व्यक्त केली.

तसेच घोडगाव केंद्रानेही उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला. केंद्रातील तीनही विद्यार्थी उत्तीर्ण होत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. केंद्र प्रमुख तसेच सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकवर्ग यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून आगामी मुख्य परीक्षेसाठी त्यांना नवी उभारी मिळाली आहे.

No comments