कुख्यात गुंडावर बंदुकीतून फायरिंग..गुंड रक्ताच्या थारोळ्यात..७ गोळया झाडल्या शहर हादरलं प्रकृती चिंताजनक सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:-...
कुख्यात गुंडावर बंदुकीतून फायरिंग..गुंड रक्ताच्या थारोळ्यात..७ गोळया झाडल्या शहर हादरलं प्रकृती चिंताजनक
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:-बुधवार दि.४ मार्च सायंकाळी जामखेडच्या न्युरानी कॉलनी रोड भागात एक धक्कादायक गोळीबाराची घटना घडली असून मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कुख्यात गुंड सागर मोहळकर याच्यावर तब्बल ७ फायरिंग केले.त्यात मोहळकर गंभीरपणे जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. या
घटनेनंतर भीतीचे वातावरण पसरले व घटनास्थळी मोठी गर्दी जमली.मोहळकर याना त्वरित प्राथमिक उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले गेले, त्यानंतर पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की हल्लेखोर आतापर्यंत फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे.प्राथमिक तपासा नुसार ही घटना गँगवॉर किंवा वैयक्तिक वैरातून झालेली असण्याची शक्यता आहे.सागर मोहळकर हा काही महिने पूर्वी न्यायिक बन्दोबस्ताखाली कारागृहात होता आणि सध्या जामिनावर बाहेर आहे.स्थानिक गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि भूतकाळातील गुन्हे यामुळे ही घटना अधिक संवेदनशील बनली आहे.पोलिसांनी घटनास्थळी नाकेबंदी घातली असून तपास पूर्ण वेगाने सुरू आहे.

No comments