adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

*स.पो‌. नि. सचिन कांडगे यांनी पारगांव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला ; पोलीस ठाण्याला मिळाला खमक्या अधिकारी!

 *स.पो‌. नि. सचिन कांडगे यांनी पारगांव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला ; पोलीस ठाण्याला मिळाला खमक्या अधिकारी!    रणजित मस्के  ( पुणे जिल्हा ...

 *स.पो‌. नि. सचिन कांडगे यांनी पारगांव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला ; पोलीस ठाण्याला मिळाला खमक्या अधिकारी! 



 रणजित मस्के  ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


 कर्तव्यदक्ष आणि खाकी वर्दीतील आपलेपणा जपणारे पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सचिन कांडगे यांनी पारगांव पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार स्वीकारला आहे. सचिन कांडगे यांनी यापूर्वी पुणे ग्रामीण सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. पोलीस ठाण्यातील परिसरातील जनतेला हवे असणारे अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांना चांगलेच ओळखले जाते. त्यांनी यापूर्वीही ओतूर तर सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर पोलीस ठाण्यातही नेहमीच प्रयत्नशील राहिले, पुणे ग्रामीण विभागातील नुकत्याच झालेल्या बदल्यामध्ये त्यांची पारगांव पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण विभागातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एलसीबी मध्येही मोठा बदल दिसून आला आहे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे कुठून /कुठे पहा) पो.नि. अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा ते सायबर पोलीस ठाणे)पो.नि. प्रमोद क्षीरसागर नियंत्रण कक्ष ते स्थानिक गुन्हे शाखा) पो.नि. सूर्यकांत कोकणे सायबर पोलीस ठाणे ते प्रभारी अर्ज शाखा) पो.नि. शंकर पाटील कामशेत पोलीस ठाणे ते वडगांव मावळ पोलीस ठाणे) स.पो.नि. ज्ञानेश्वर बाजगिरे उरळीकांचन पोलीस ठाणे ते ओतूर पोलीस ठाणे) स.पो.नि. आकाश पवार वाचक पोलीस अधीक्षक कार्यालय ते कामशेत पोलीस ठाणे)स.पो.नि. सचिन कांडगे नियंत्रण कक्ष ते पारगांव पोलीस ठाणे) अशा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून . बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना आपल्या पदस्थापने ठिकाणी पदभार घेवुन तसा अहवाल मुख्यालयाकडे सादर करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिले आहेत.*

No comments