*चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात अविष्कार २K२६ सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात संपन्न.* चोपडा प्रतिनिधी (संपादक :- हेमकांत गा...
*चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात अविष्कार २K२६ सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात संपन्न.*
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
चोपडा महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग & पॉलिटेक्निक), चोपडा महाविद्यालयात “अविष्कार २K२६” हा सांस्कृतिक महोत्सव दि. २४मार्च व २५ मार्च २०२६ रोजी उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रेने झाली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
या महोत्सवात ट्रॅडिशनल डे, मिस-मॅच डे, रॅम्प वॉक, बॉलीवूड डे, रांगोळी स्पर्धा, गीत गायन, वन मिनिट शो, ड्रामा, डान्स आणि मिमिक्री अशा विविध आकर्षक स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि आपल्या उत्कृष्ट कलागुणांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव मा. ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.गौरव महाले उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या कला व कौशल्याचे कौतुक केले. यावेळी तंत्र शिक्षण समितीचे सदस्य डॉ हनुमंतराव गंगाधर सूर्यवंशी हेही उपस्थितीत होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. व्ही एन बोरसे यांनी विद्यार्थ्यांना “विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती सोबत अशा उपक्रमांद्वारे आपल्या कला, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्व विकासावरही भर द्यावा.” असे मार्गदर्शन केले. प्रसंगी सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक इतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मोहिनी पाटील आणि सुजाता पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक म्हणून प्रा.पी के चौधरी यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
या महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विजेते म्हणून घोषित करण्यात आले. त्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अँड संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव मा. ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील व प्रा.गौरव महाले सर यांनी कौतुक करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“अविष्कार २K२६” या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्तम वाव मिळाला आणि महाविद्यालयात उत्साह, सर्जनशीलता आणि एकात्मतेचे सुंदर दर्शन घडले...

No comments