adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लासुर येथे संत तुकाराम बीज पालखी सोहळा ..

  लासुर येथे संत तुकाराम बीज पालखी सोहळा .. विश्राम तेले चौगाव प्रतिनिधी :- (संपादक :- हेमकांत गायकवाड) लासुर ता चोपडा येथे जगद्गुरु संत तुक...

 लासुर येथे संत तुकाराम बीज पालखी सोहळा ..


विश्राम तेले चौगाव प्रतिनिधी :-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

लासुर ता चोपडा येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज महोत्सव समिती व मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज महोत्सव निमित्ताने अखंड ज्योत कीर्तनि सप्ताह आयोजित केलेला होता. आठ दिवस भाविकांनी कीर्तन श्रवणाचा आनंद घेतला .(दि. ५) गुरुवार रोजी संत तुकाराम महाराजांच्या बीज महोत्सव निमित्ताने पालखी मिरवणूक काढण्यात आली. संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन उद्योजक योगेश नारायण पाटील यांनी केले. गावातील श्रीराम भजनी मंडळ यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग, गौळणी व धार्मिक गीते गाऊन एक उत्साह निर्माण केला. गावातील लोकनियुक्त सरपंच नर्मदाबाई भील,राजेंद्र पाटील, राजेंद्र  महाजन. यांनी पालखी ओढण्याचा मान स्वीकारला . या महोत्सवच्या आयोजनासाठी उपसरपंच अनिल पाटील, मराठा समाज अध्यक्ष सचिन पाटील ,माजी उपसरपंच वसंत पाटील, विठ्ठल पाटील,आत्माराम पाटील, विजय पाटील, विश्वास पाटील, विक्रम जावरे, गोरख पाटील, रवींद्र पाटील ,ह भ प बापू महाराज , रोहन पाटील,प्रकाश पाटील, गोकुळ पाटील ,प्रकाश ठाकूर, राजेंद्र पाटील ,प्रल्हाद पाटील, सुधीर पाटील, व अशोक माळी यांनी परिश्रम घेतले.(फोटो उद्योजक योगेश नारायण पाटील पालखी सोहळ्याचे पूजन करताना)..

No comments