सांगली जिल्ह्यात पतीकडून पत्नीची हत्या; अनैतिक संबंधाची झालर आटपाडी पोलीस घटनास्थळी दाखल संभाजी पुरीगोसावी (सांगली जिल्हा) प्रतिनिधी. (सं...
सांगली जिल्ह्यात पतीकडून पत्नीची हत्या; अनैतिक संबंधाची झालर आटपाडी पोलीस घटनास्थळी दाखल
संभाजी पुरीगोसावी (सांगली जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
प्रेम संबंध तसेच विवाहित महिलांवरांचे अनैतिक संबंधाच्या घटनेंमध्ये चांगलीच वाढ दिसून येत आहे. यामध्ये जळगांव जिल्ह्यातून प्रेम संबंधातून रक्तरंजित झालेल्या घटना नुकत्याच ताज्या असताना सांगली जिल्ह्यातही आटपाडी तालुक्यांतील निंबवडे येथे चारित्र्याच्या संशयावरून पती अंकुश वाघमारे यांनी आपल्या पत्नी मंगल वाघमारे हिच्या डोक्यात व तोंडावर लाकडी दांडक्याने मारहाण करून तिच्या हत्या केली आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिसांनी पती अंकुश बाळू वाघमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगल अंकुश वाघमारे (वय 32 ) रा. रायगड सध्या निंबवडे ता. आटपाडी ) असे या मृत विवाहित महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून अंकुश बाळू वाघमारे हा पत्नीवर नेहमीच चारित्र्याच्या संशय घेवुन तिच्यासोबत वारंवार भांडण करीत होता. ( दि. 19 ) मार्च रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या दोघांच्या वादामध्ये त्याने पत्नीच्या डोक्यात व तोंडावर लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात मंगल वाघमारे गंभीरित्या जखमी झाली उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी पती अंकुश वाघमारे यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विनय बहिर करीत आहेत.

No comments