सहकारी संस्थाना निधी व्यवस्थापानाचे ज्ञान आवश्यक जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेडे इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपू...
सहकारी संस्थाना निधी व्यवस्थापानाचे ज्ञान आवश्यक जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेडे
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर सहकारी संस्थानचे निधी सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेची असून त्यासाठी अद्ययावत माहिती संस्था चालकाना असणे आवश्यक असल्याचे मत सहकार भारती जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी व्यक्त केले आज फैजपूर शहरसह यावल व रावेर तालुक्यातील सहकारी पतसंस्था संचालक व कर्मचारी यांचे प्रशिक्षण शिबिर सम्पन्न झाले याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी पतसंस्था कडे असलेला निधी मान्यताप्राप्त लेखा परीक्षण वर्ग एक असलेल्या विविध बॅंक मध्येच सुरक्षितता तपासून गुंतवणूक करावी असे आवाहन केले कर्ज अदा करताना मालमत्तेचे वर्गीकरण तपासणे व व्यवसायिक उत्पन्न स्रोत बघणे सुध्दा गरजेचे असल्याचे सांगितले यावेळी बाळवन्त पतसंस्थाचे कार्यकारी संचालक जयदीप शहा यांनी सहकार विभागाचे नवीन परिपत्रक व कर्ज वाटप धोरण नवीन संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जळगाव जिल्हा सहकार भारतीने केले होते प्रशिक्षण कार्यक्रम सहकार भारतीचे प्रशिक्षण केंद्र सातारा चे प्रमुख संजय जी बिर्ला यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला व्यासपीठावर सहकार भारतीचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र भाऊ नारखेडे महामंत्री शशिकांत बेहडे तालुका अध्यक्ष महेश गडे कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर चौधरी दूध संघ संचालक नितीन चौधरी हेमराज चौधरी व्हा चेअरमन मनोजकुमार पाटील संचालक अनिल नारखेडे अप्पा भालचंद्र चौधरी सुनील वाढे डा गणेश चौधरी सह पतसंस्था पदाधिकारी व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्र संचालन शशिकांत बेहडे यांनी केले कार्यक्रम नियोजन सातपुडा व्यवस्थापक काशीनाथ वारके लक्ष्मी नागरी पतसंस्था व्यवस्था पक जयश्री चौधरी राजेंद्र मानेकर विलास तायडे किशोर नेहते गौरव नारखेडे यांनी परिश्रम घेतले

No comments