जेष्ठ नागरिक संघाचा गौरव; चोपड्यात आनंदोत्सव साजरा चंद्रकांत पाटील चोपडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- शहरातील नारायणवाडी भागात अस...
जेष्ठ नागरिक संघाचा गौरव; चोपड्यात आनंदोत्सव साजरा
चंद्रकांत पाटील चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- शहरातील नारायणवाडी भागात असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाला यंदाचा उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघ पुरस्कार मिळाल्याबद्दल चोपड्यात ज्येष्ठ नागरिकांनी मिळून आनंदोत्सव साजरा केला . फेस्कॉम चे महाराष्ट्र अध्यक्ष डीटी चौधरी यांनी आज दिनांक 19 रोजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात संघाला मिळालेल्या पारितोषिकाचे कौतुक केले ही स्मृतिचिन्ह पुन्हा जयदेव देशमुख यांच्या हाती सोपवताना त्यांनी आनंद व्यक्त केला, यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक सदस्य रमणलाल बाबुलाल गुजराती, मधुकर पाटील, रमेश शिंदे तात्या, श्यामा भाई गुजराती, जगन्नाथ पाटील, जिजाबराव नेर पगारे, दिलीपराव पाटील, गोविंदा महाजन, इंडी महाजन , धर्मा मराठे, सुभाष पाटील, संघसचिव विलास पाटील, व्ही .एस. पाटील, गोविंदराव मराठे, दत्तात्रेय धनगर, राजेंद्र साळुंखे, भगवान देशमुख ,रामकृष्ण महाजन, अरुण पाटील एस एम पाटील, गोकुळ पाटील , पेंढारकर आधार माळी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात चोपडा नगरीचे उपनगराध्यक्ष पंकज बोरवली यांनाही गौरविण्यात आले. व्यासपीठावर डॉक्टर सुरेश बोरोले, डी व्ही पाटील भगवान भाऊलाल उर्फ छोटू वार्डे रामकृष्ण महाजन, व ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक उपस्थित होते सूत्रसंचालन शांताराम पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विलास पाटील यांनी केले

No comments