adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संसाराची राख पतीने पत्नी दिपालीला संपविले, आरोपी पती स्वतःहून पोलीस जळगांव तालुका ठाण्यात हजर...

 संसाराची राख पतीने पत्नी दिपालीला संपविले, आरोपी पती स्वतःहून पोलीस जळगांव तालुका ठाण्यात हजर...    सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (जळगांव जि...

 संसाराची राख पतीने पत्नी दिपालीला संपविले, आरोपी पती स्वतःहून पोलीस जळगांव तालुका ठाण्यात हजर... 


 

सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (जळगांव जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 जळगांव जिल्ह्यातील निमखेडी गावात गुढीपाडव्याच्या सणादिवशी आपल्या पतीने कौटुंबिक आणि अनैतिक संशयातून धारदार शस्त्राने वार करीत तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिपाली नितीन सोनवणे (वय 28) रा. निमखेडी जि. जळगांव) असे विवाहित महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून पत्नी दिपाली सोनवणे आणि पती नितीन विजय सोनवणे (वय 35) हे आपल्या दोन मुलं व एक मुलीसह वास्तव्यास होते. पती नितीन सोनवणे हा मोल मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करीत होता. मागील काही दिवसांपासून बाह्य अनैतिक संबंध तसेच कौटुंबिक वादांतून या दोघांची नेहमीच भांडणे होत होती. पाडव्याच्या सणादिवशीही दिपाली आणि नितीन या दोघांमध्ये भर दुपारी तीनच्या सुमारांस झालेल्या वादांतून संतापलेल्या पती नितीन सोनवणे यांनी धारदार शस्त्राने आपल्या पत्नीच्या पोटावर मानेवर सपासप वार केले यात दिपाली सोनवणे गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी पती नितीन हा स्वतःहून जळगांव तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला मृत महिलेच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार असून या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी जळगांव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No comments