एमटीएस परीक्षेत रिशान बोरोलेची उल्लेखनीय कामगिरी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा : महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा (MTS) ...
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा (MTS) मध्ये पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा गौरव वाढवला आहे. इयत्ता दुसरी मध्ये शिक्षण घेणारा चि. रिशान पंकज बोरोले याने या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. रिशानने तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत ६ वा क्रमांक, जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत २० वा क्रमांक तसेच राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत २८ वा क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्याने २०० पैकी ११६ गुण प्राप्त करत स्पर्धात्मक परीक्षेत आपली चमक दाखवली आहे. या यशामागे त्याचे सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि पालकांचे भक्कम सहकार्य हे घटक महत्त्वाचे ठरले. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या वतीने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकवृंद व पालकांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. रिशानच्या या यशामुळे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण परंपरेला आणखी बळ मिळाले असून इतर विद्यार्थ्यांसाठीही तो प्रेरणादायी ठरला आहे.

No comments