adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिरपूर ०१ व ०२ मध्ये ‘एअर कंडिशनर’ (वातानुकूलित) च्या नावाखाली पैशांची उधळपट्टी?..

  सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिरपूर ०१ व ०२ मध्ये ‘एअर कंडिशनर’ (वातानुकूलित) च्या नावाखाली पैशांची उधळपट्टी? विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मु...

 सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिरपूर ०१ व ०२ मध्ये ‘एअर कंडिशनर’ (वातानुकूलित) च्या नावाखाली पैशांची उधळपट्टी?


विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मुख्य अभियंत्यांना चौकशीचे आदेश



नाशिक / जळगांव प्रतिनिधी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. ०१ व ०२, शिरपूर येथे अधिकार नसताना जनतेकडून एअर कंडिशनर (वातानुकूलित) बसविण्याच्या नावाखाली पैशांची उकळपट्टी केल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

या संदर्भात पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता तथा ऑल इंडिया ब्लू टायगर सेना, जळगाव जिल्हाध्यक्ष हेमकांत बळीराम गायकवाड यांनी २६ डिसेंबर २०२५ रोजी ई-मेलद्वारे तक्रार अर्ज सादर केला होता.या तक्रारीत शिरपूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागातील अधिकाऱ्यांनी अधिकार नसतानाही आपल्या दालनात एअर कंडिशनर (वातानुकूलित) बसविण्यासाठी जनतेकडून पैसे उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.

सदर तक्रारीवर यापूर्वीही विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पत्रव्यवहार करण्यात आला होता.मात्र अद्यापपर्यंत संबंधित प्रकरणात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने तक्रारदाराने पुन्हा ई-मेलद्वारे तक्रार सादर केली होती.

या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथील सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग,नाशिक येथील मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवून तक्रारीतील बाबींची चौकशी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधितांना कळवावी,असे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,चौकशीत नेमके काय निष्पन्न होते व दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

No comments