adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागात नियमभंग? ए.सी (वातानुकूलित) वापरावरून चौकशीचे आदेश...

  अंमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागात नियमभंग? ए.सी (वातानुकूलित) वापरावरून चौकशीचे आदेश.. तक्रारीनंतर अधीक्षक अभियंत्यांची दखल; कार्यकारी अभि...

 अंमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागात नियमभंग? ए.सी (वातानुकूलित) वापरावरून चौकशीचे आदेश..


तक्रारीनंतर अधीक्षक अभियंत्यांची दखल; कार्यकारी अभियंत्यांना कारवाईचे निर्देश




जळगाव प्रतिनिधी :-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


अंमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अधिकार नसताना वातानुकूलन ए.सी (वातानुकूलित) सुविधेचा वापर केल्याचा आरोप समोर आल्याने विभागात खळबळ उडाली आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ,जळगाव यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

चोपडा येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते तथा पत्रकार हेमकांत बळीराम गायकवाड यांनी दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी लेखी तक्रार सादर करून अंमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तसेच त्यांच्या अधिनस्त कार्यालयांमध्ये अधिकार नसतानाही ए.सी (वातानुकूलित)

सुविधा वापरली जात असल्याचा आरोप केला होता.तसेच या प्रकारामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर अधीक्षक अभियंता,सार्वजनिक बांधकाम मंडळ,जळगाव यांनी कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,अंमळनेर यांना पत्र पाठवून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तक्रारीतील मुद्द्यांनुसार नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदारास कळविण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चौकशीअंती संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे...

No comments