adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

*चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनाच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी.*.

*चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनाच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी.* चोपडा तालुका प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत गायकवाड) दोंडाईचा येथ...

*चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनाच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी.*



चोपडा तालुका प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धेत चोपडा येथील श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग & पॉलिटेक्निक), चोपडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये तंत्रनिकेतन विभागातील विद्युत विभागाच्या विद्यार्थ्यांनी “स्मार्ट सिंचन प्रणाली” हा प्रकल्प सादर करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या प्रकल्पासाठी कल्पेश योगेश पाटील, ओम शैलेश इखणकर, यशवंत मनोज पवार व लोकेश जगदीश सोनवणे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या यशाबद्दल त्यांना ₹१५०० रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच Robotics and Automation या विषयाअंतर्गत आयोजित “रांगोळीची शक्ती” या स्पर्धेत दीपाली भारत पाटील व पूजा बाबुलाल चौधरी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला . त्यांना ₹१००० रोख पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.या विद्यार्थ्यांना प्रा.भुषण पवार व विभागप्रमुख प्रा.कमलेश पाटील यांचे मागदर्शन लाभले. या यशाबद्दल  महाविद्यालयाचे प्राचार्य  प्रा.व्ही. एन. बोरसे, दादासाहेब डॉ सुरेश जी पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.के एन सोनवणे ,संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अँड संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव मा. ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

No comments