adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अनेर नदीत चार मुलांचे प्राण वाचवणाऱ्या उमेश पाटीलचा गौरव; धाडसाचे सर्वत्र कौतुक

 अनेर नदीत चार मुलांचे प्राण वाचवणाऱ्या उमेश पाटीलचा गौरव; धाडसाचे सर्वत्र कौतुक  मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता.चोपडा (संपादक हेमकांत गायकवाड) ...

 अनेर नदीत चार मुलांचे प्राण वाचवणाऱ्या उमेश पाटीलचा गौरव; धाडसाचे सर्वत्र कौतुक 


मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता.चोपडा

(संपादक हेमकांत गायकवाड)

चोपडा:-  तालुक्यातील गलंगी-गणपूर परिसरातील उमेश (ओम) रवींद्र पाटील या १४ वर्षीय शाळकरी मुलाने अनेर नदीत बुडणाऱ्या चार मुलांचे प्राण वाचवून दाखवलेल्या धाडसाबद्दल त्याचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येत असून त्याच्या शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या धाडसी कार्याची दखल घेत विधानसभा माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी उमेशच्या घरी भेट देत त्याचा सत्कार केला व बक्षीस देऊन त्याच्या धाडसाचे विशेष कौतुक केले. यावेळी शशिकांत पाटील तसेच पत्रकार ॲड. बाळकृष्ण पाटील उपस्थित होते.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेशभाऊ नेमाडे यांनीही गणपूर येथे उमेशचा सत्कार करून त्याच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमास धानोऱ्याचे रवींद्र चौधरी, घोडगावचे उपसरपंच किशोर दुसाने, दीपक वानखेडे, पत्रकार ॲड. बाळकृष्ण पाटील, हर्षल करंदीकर, विनोद पाटील, डॉ. किरण पाटील, प्रवीण पाटील, गणेश पाटील तसेच उमेशचे वडील रवींद्र साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.

अल्पवयातच दाखवलेल्या या धाडसामुळे उमेश पाटील हा इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरत असून परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments