गोरगावले बु. येथे HPV लसीकरणाचा शुभारंभ; गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध जनजागृती चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- ता...
गोरगावले बु. येथे HPV लसीकरणाचा शुभारंभ; गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध जनजागृती
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- तालुक्यातील गोरगावले बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दिनांक २८ मार्च २०२६ (शनिवार) रोजी एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. गर्भाशय मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने या लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
एचपीव्ही (Human Papillomavirus) हा एक विषाणू असून तो प्रामुख्याने लैंगिक संपर्कातून पसरतो. यामुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग तसेच इतर काही कर्करोग आणि जननेंद्रियांवरील गाठी (warts) होण्याचा धोका निर्माण होतो. या आजारांपासून बचावासाठी एचपीव्ही लस प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय मानली जाते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या आदेशानुसार तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीष गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरीशंकर शिसोदिया, गोरगावले बु. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश निळे, डॉ. शर्वरी पाटील आदी उपस्थित होते.
या लसीकरण सत्रात १५ वर्षे वयोगटातील एकूण ३८९ अपेक्षित मुलींपैकी २३ मुलींनी एचपीव्ही लस घेतली.
कार्यक्रमाचे उद्घाटन गोरगावले बु. ग्रामपंचायतीच्या प्रशासक तथा माजी सरपंच सौ. सुरेखा कोळी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य कार्यालयाचे आरोग्य सहाय्यक विजय देशमुख, तालुका लसीकरण सनीयंंत्रण अधिकारी दिलवर वडवी यांचीही उपस्थिती होती. तसेच उपस्थित लाभार्थी व त्यांच्या पालकांना एचपीव्ही लसीचे फायदे, १५ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींना लसीकरणाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन डॉ. दिनेश निळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सहाय्यक रविंद्र काटे, सुनील महाजन, आरोग्य सहाय्यिका सौ. ज्योती न्हायदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ कुणाल शिंदे, औषध निर्माण अधिकारी सुयश बोरसे, आरोग्य सेवक डॉ. महेंद्र पाटील, दिनकर वाघ, अनिल माळी, कनिष्ठ सहाय्यक विशाल देवराज, आरोग्य सेविका माधुरी बडगुजर, दिग्विजय पाटील, रविंद्र पवार, डेटा ऑपरेटर संतोष वाघ, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका तसेच लाभार्थी व त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


No comments