राज्यस्तरीय सन्मानाने यावल तालुक्याचा गौरव; डी. बी. पाटील दांपत्याचा मानाचा तुरा चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल जि. जळग...
राज्यस्तरीय सन्मानाने यावल तालुक्याचा गौरव; डी. बी. पाटील दांपत्याचा मानाचा तुरा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल जि. जळगाव: तालुक्यातील तुबा नाज हेल्प मल्टिपर्पज सोसायटीच्या कार्याला राज्यस्तरावर मोठी दाद मिळाली असून, संस्थेचे मॅनेजर डी. बी. पाटील व त्यांच्या पत्नी सौ. छाया पाटील यांना पंडित जवाहरलाल नेहरू व कस्तुरबा गांधी राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
हा प्रतिष्ठित पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डी. बी. पाटील व छाया पाटील यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. समाजसेवा, शैक्षणिक व विविध सामाजिक उपक्रमांमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या सन्मानामुळे यावल तालुका तसेच जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या कार्याबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसेच अशोक कोळी (घाडवेल) यांनीही डी. बी. पाटील दांपत्याचे कौतुक करून मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
समाजासाठी प्रेरणादायी व सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तींना मिळालेला हा सन्मान इतरांसाठीही आदर्श ठरणारा असून, अशा कार्यामुळे समाजात नवी ऊर्जा निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.


No comments