adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अकुलखेडा विकास सोसायटीची सलग चौथ्या वर्षी १०० % पीक कर्जफेड; शेतकऱ्यांचा आदर्श उपक्रम

 अकुलखेडा विकास सोसायटीची सलग चौथ्या वर्षी 100% पीक कर्जफेड; शेतकऱ्यांचा आदर्श उपक्रम  चंद्रकांत पाटील विचखेडा  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 अकुलखेडा विकास सोसायटीची सलग चौथ्या वर्षी 100% पीक कर्जफेड; शेतकऱ्यांचा आदर्श उपक्रम 


चंद्रकांत पाटील विचखेडा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अकुलखेडा (ता. चोपडा, जि. जळगाव) : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने (विकास सोसायटी) यंदाही सलग चौथ्या वर्षी बँकेचे पीक कर्ज १०० टक्के फेडून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ३१ मार्चपूर्वीच संपूर्ण कर्जफेड पूर्ण करण्यात आल्याने परिसरात समाधान व्यक्त होत असून इतर संस्थांसाठीही हा आदर्श ठरत आहे.

या यशामध्ये सर्व शेतकरी कर्जदार सभासदांचे मोलाचे योगदान असून, त्यांनी वेळेवर कर्जफेड करून सहकार चळवळीला बळकटी दिली आहे. तसेच जे.डी.सी.सी. बँकेचे विभागीय अधिकारी श्री. भालोदकर साहेब, शाखा व्यवस्थापक श्री. मंगेश पाटील, विकासो सचिव श्री. दत्तात्रय पाटील, लिपिक श्री. समर्थ पाटील यांनीही मार्गदर्शन व सहकार्य केले.

संस्थेचे चेअरमन श्री. सुनील महाजन, उपाध्यक्ष (व्हा. चेअरमन) प्रा. महेंद्र बोरसे व सर्व संचालक मंडळ यांनी सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

यासोबतच चोपडा मल्हारपुरा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादितचे सचिव तथा चोपडा तालुका सहकारी देखरेख संस्था मर्यादितचे सहाय्यक सचिव श्री. दत्तात्रेय रंगराव सपकाळे यांनीही या यशाबद्दल समाधान व्यक्त केले असून, संस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले आहे.

अकुलखेडा विकास सोसायटीची ही सलग चौथ्या वर्षीची १०० टक्के कर्जफेड सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करणारी ठरत असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक शिस्तीचेही हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.

No comments