adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव मनसेची धुरा पुन्हा 'फायरब्रँड' गजानन राणे यांच्या खांद्यावर!

  जळगाव मनसेची धुरा पुन्हा 'फायरब्रँड' गजानन राणे यांच्या खांद्यावर! जळगाव जिल्हा प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत गायकवाड) महाराष्ट्र...

 जळगाव मनसेची धुरा पुन्हा 'फायरब्रँड' गजानन राणे यांच्या खांद्यावर!



जळगाव जिल्हा प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसेच्या आक्रमक आणि 'फायरब्रँड' नेतृत्वाची पुन्हा एकदा जळगावात एन्ट्री झाली आहे. मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस आणि राजसाहेबांचे अत्यंत विश्वासू शिलेदार आदरणीय श्री. गजानन नारायण राणे साहेब यांची जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्षपदी पुनश्च नियुक्ती करण्यात आली आहे. या एका नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून मनसैनिकांमध्ये अंगात संचारणारे नवचैतन्य निर्माण झाले आहे.


​दिग्गजांच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकवणारा 'गनिमी कावा' पुन्हा सक्रिय!

​ज्यांनी २०१३ मध्ये जळगावच्या राजकारणातील  'मनसेचे १३ नगरसेवक आणि महापौर' निवडून आणण्याचा पराक्रम केला होता, त्या अनुभवी आणि रणनीतीकार नेतृत्वाकडे तब्बल १२ वर्षांनंतर राजसाहेबांनी पुन्हा जळगावची जबाबदारी सोपवली आहे. गजानन राणे हे केवळ नेते नसून कामगारांच्या हक्कासाठी मल्टिनॅशनल कंपन्यांना घाम फोडणारे आक्रमक वादळ आहेत. प्रशासकीय असो वा व्यावसायिक पातळीवर, सामान्यांच्या प्रश्नावर त्यांनी नेहमीच 'मनसे स्टाईल'ने आक्रमक भूमिका घेतली आहे.

जुने-नवे एकत्र येणार; 'नवनिर्माण' घडवणार!

जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आणि मनसेला सुवर्णकाळ दाखवण्यासाठी जळगावला सध्या एका खंबीर, स्पष्टवक्ते आणि अनुभवी नेतृत्वाची गरज होती, जी राणे साहेबांच्या रूपाने पूर्ण झाली आहे. जुन्या जाणत्यांना सोबत घेऊन आणि नव्या रक्ताला उभारी देण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या निवडीमुळे जळगाव जिल्ह्यात मनसेचे संघटन आता अधिक मजबूत आणि आक्रमक होणार, हे निश्चित आहे.

सर्व स्तरांतून स्वागत व अभिनंदन

​या ऐतिहासिक निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना मनसे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी सांगितले की, "राणे साहेबांच्या अनुभवाचा आणि रणनीतीचा फायदा जळगावमधील प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला होईल व जिल्ह्याच्या राजकीय संघटनाला यामुळे एक नवी ऊर्जा मिळाली आहे."

तसेच मनविसे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, "हा खऱ्या अर्थाने आनंददायी आणि ऐतिहासिक क्षण आहे. राजसाहेबांचा आणि अमितसाहेबांचा विचार आता घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत.

गजानन राणे साहेबांच्या मार्गदर्शनात जळगाव जिल्ह्यात मनसेचे 'नवनिर्माण' आता निश्चित आहे!"

पुन्हा एकदा आदरणीय गजानन राणे साहेबांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस 'वादळी' शुभेच्छा!

No comments