adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा आगारातून नांदुरीगड यात्रोत्सवासाठी जादा बसेस..

  चोपडा आगारातून नांदुरीगड यात्रोत्सवासाठी जादा बसेस.. चोपडा (प्रतिनिधी) –  (संपादक :- हेमकांत गायकवाड) नांदुरीगड येथील सप्तश्रृंगी मातेच्या...

 चोपडा आगारातून नांदुरीगड यात्रोत्सवासाठी जादा बसेस..


चोपडा (प्रतिनिधी) – 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


नांदुरीगड येथील सप्तश्रृंगी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातर्फे दिनांक २७ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.


गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सोयीस्कर प्रवास उपलब्ध व्हावा यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणांहून पुरेसे प्रवासी उपलब्ध होतील, त्या ठिकाणांहूनही मागणीनुसार जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली आहे.


चोपडा ते नांदुरीगड या मार्गासाठी प्रौढ प्रवाशांचे पूर्ण भाडे ३७३ रुपये, तर अर्धे भाडे १८७ रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. या जादा बसेसचा जास्तीत जास्त लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी केले आहे.


दरम्यान, यात्रोत्सवानिमित्त चोपडा येथील एलआयसीचे ज्येष्ठ विमा सल्लागार प्रवीण पाटील यांनी यात्रा स्पेशल बसेससाठी स्टिकर्स स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. त्यांच्या या उपक्रमाचे आगार प्रशासन तसेच भाविकांकडून कौतुक करण्यात येत आहे...

No comments