adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मनवेल येथे नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या भाविकांचे स्वागत..

  मनवेल येथे नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या भाविकांचे स्वागत..    भरत कोळी यावल प्रतिनिधी :- (संपादक :- हेमकांत गायकवाड)   भारतीय संस्कृतीत ...

 मनवेल येथे नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या भाविकांचे स्वागत..

  



भरत कोळी यावल प्रतिनिधी :-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


 भारतीय संस्कृतीत नद्यांना देवता मानतात.नद्यांबद्दल पूज्य भावना, कृतज्ञता व आदर व्यक्त करण्याची आपली पुरातन परंपरा आहे. यासाठी असंख्य प्रथा, चालीरीती, रितीरिवाज आहेत. त्यातीलच एक वैशिष्ट्यपूर्ण व पृथ्वीतलावरील एकमेवाद्वितीय परंपरा म्हणजे नर्मदापरिक्रमा होय.

       याच परंपरेला मनवेल येथील चंपालाल गोकुळ पाटील या यांनी नर्मदा मैय्या ची पाचवी परिक्रमा दि.११ जानेवारी रोजी शुभमुहूर्तावर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, मध्यप्रदेश येथून संकल्प करून ४८ दिवस यात्रेत पायी चालत माता नर्मदेची पायी परिक्रमा दि. १ मार्च २०२६ रोजी पूर्ण केली. 

अत्यंत खडतर समजली जाणारी पायी नर्मदा परिक्रमा मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड राज्यांतून जवळपास बाविस जिल्ह्यामधून साधारणत साडेतीन हजार किमीचा पायी प्रवास करतांना शूलपानी, लक्कडकोट, चव्यनं, अमरकंठ , सातपुडा चे मोठे मोठे घनदाट जंगल, शेकडो पर्वतांना वळसा, रोज नर्मदा मातेची पूजा, संध्यावंदन, नित्यपाठ सतत ' नर्मदे हर ' नावाचा जप व नामस्मरण करत पाठीवर आठ ते दहा किलो वजनाची दैनंदिन वापरातील साहित्याची बॅग घेत वयाच्या ५८ व्या वर्षी ही नर्मदा पायी परिक्रमा थंडीत, पावसात, ना शारीरिक थकवा, ना गुडघेदुखी, ना टाचेचे दुखणे, ना तळपायावर फोड याप्रमाणे पूर्ण केली ती केवळ त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीनेच !

      दि. ५ मार्च २०२६ रोजी परिक्रमा पूर्ण करून मनवेल गावातील येथील श्री मानकेश्वर महादेव, महर्षि वाल्मिक ऋषि , छत्ररपती शिवाजी महाराज , विठ्ठल रुक्मिणी मांदिरात व धुनीवाले दादाजी दरबारात जलपुजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ..

No comments