adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय येथे ‘लिंगसंवेदनशीलता’ विषयावर जनजागृती कार्यक्रम उत्साहात

श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय येथे ‘लिंगसंवेदनशीलता’ विषयावर जनजागृती कार्यक्रम उत्साहात प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत...

श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय येथे ‘लिंगसंवेदनशीलता’ विषयावर जनजागृती कार्यक्रम उत्साहात



प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर:-  श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील अंतर्गत तक्रार निवारण समिती (लैंगिक छळ प्रतिबंध व निषेध समिती) यांच्या वतीने दि. ४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात “लिंगसंवेदनशीलता” या विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींमध्ये स्त्री-पुरुष समानतेची जाणीव निर्माण करणे, परस्पर आदराची भावना दृढ करणे, संमतीचे महत्त्व समजावून सांगणे तसेच लैंगिक छळ प्रतिबंधासंबंधी कायदेशीर व सामाजिक जागरूकता वाढवणे हा होता. कार्यक्रमास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या अ‍ॅड. सौ. सुजाता इंगळे यांनी प्रभावी मार्गदर्शन करत लिंगसंवेदनशीलतेचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित केले. महिलांचे कायदेशीर हक्क, सक्षमीकरण, कार्यस्थळी सुरक्षित वातावरणाची आवश्यकता आणि लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्यांची सविस्तर माहिती त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केली. त्यांच्या विचारप्रवर्तक मांडणीमुळे विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण होऊन आत्मविश्वास वाढीस लागला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. बी. साळवे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी अशा जनजागृतीपर उपक्रमांची आजच्या काळातील आवश्यकता अधोरेखित करत विद्यार्थिनींनी स्वतःचे हक्क जाणून घेत आत्मसन्मान व सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या सदस्या प्रा. डॉ. सी. व्ही. ठींगळे यांनी प्रभावी शैलीत केले. समितीच्या अध्यक्षा व उपप्राचार्या प्रा. डॉ. वंदना चौधरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. जी. एस. चव्हाण यांनी केले. एकूणच, लिंगसंवेदनशीलता विषयक हा कार्यक्रम विद्यार्थिनींसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि समाजजागृतीचा प्रभावी संदेश देणारा ठरला.

No comments