adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धानोरा येथे मनसेची भव्य सदस्य नोंदणी मोहीम; संघटन बांधणीला वेग

 धानोरा येथे मनसेची भव्य सदस्य नोंदणी मोहीम; संघटन बांधणीला वेग  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:-  महाराष्ट्र नवनिर्माण ...

 धानोरा येथे मनसेची भव्य सदस्य नोंदणी मोहीम; संघटन बांधणीला वेग 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:-  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन राणे साहेब सध्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यामुळे मनसेच्या संघटन बांधणीला मोठा वेग आला आहे. या दौऱ्याचाच एक भाग म्हणून धानोरा (ता. चोपडा) येथे मनसेच्या वतीने भव्य सदस्य नोंदणी कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी गजानन राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “राज साहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी आणि स्थानिक युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही सदस्य नोंदणी मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात मनसेचे संघटन अधिक मजबूत करण्यावर आमचा भर आहे.” 


कार्यक्रमात जळगाव मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी कायदेशीर तसेच संघटनात्मक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. तर रावेर लोकसभा मनविसे (विद्यार्थी सेना) जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांनी युवकांनी मोठ्या संख्येने संघटनेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन राणे, जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, मनविसे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, किरण तळेले, कल्पेश खैरनार, ग्रामपंचायत सदस्य लीला विशाल महाजन, विशाल महाजन, विष्णू कोळी, चैतन्य महाजन, महेंद्र पाटील यांच्यासह गावातील असंख्य तरुण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धानोरा येथील ग्रामस्थ व युवकांनी मोठ्या उत्साहात मनसेमध्ये प्रवेश करून सदस्य नोंदणी मोहिमेला भरभरून प्रतिसाद दिला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चोपडा विधानसभा मतदारसंघात मनसेची वाढती सक्रियता सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

No comments