इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा धरणगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि. २७ फेब्रुवारी रोजी ...
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा
धरणगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय येथे मराठी भाषा विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन आदरणीय मुख्याध्यापिका सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुरेखा पाटील होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक आर. एस. पडोळ उपस्थित होते. यावेळी पर्यवेक्षक ए. एस. पाटील, सर्व शिक्षक बंधू-भगिनी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांच्या साहित्यसेवेचा व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केलेल्या योगदानाचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर करत मराठी भाषेचे महत्त्व, समृद्ध परंपरा व अभिमान व्यक्त केला.
मुख्याध्यापिका सुरेखा पाटील तसेच प्रमुख पाहुणे आर.एस. पडोळ यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे जतन, संवर्धन व दैनंदिन जीवनात मराठीचा वापर वाढविण्याचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज कोळी यांनी केले. सूत्रसंचालन कविता पाटील यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले, तर आभार प्रदर्शन स्वरूप पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाचे निरीक्षण किर्ती मराठे व अनिषा साळुंखे यांनी केले. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून संस्थेचे अध्यक्ष डी. जी. पाटील, सचिव सी. के. पाटील तसेच संचालक मच्छिंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.

No comments