adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

“शिवतेज नवनिर्माण फाऊंडेशन”ची स्थापना; समाजहितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प

 “शिवतेज नवनिर्माण फाऊंडेशन”ची स्थापना; समाजहितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) समाजाच्या...

 “शिवतेज नवनिर्माण फाऊंडेशन”ची स्थापना; समाजहितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने “शिवतेज नवनिर्माण फाऊंडेशन” या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

समाजातील तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प या संस्थेने केला आहे. शिक्षण, आरोग्य, सामाजिक जनजागृती, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी करिअर मार्गदर्शन, गरजू नागरिकांना मदत तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य करण्याचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे.

संस्थेच्या कार्यकारिणीत संस्थापक अध्यक्ष म्हणून कल्पेश राजेंद्र पवार, उपाध्यक्ष म्हणून कल्पेश श्रीराम खैरनार, सचिव म्हणून वैशाली कल्पेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कायदेविषयक सल्लागार म्हणून अॅड.उमेश शहादू मराठे, ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून अॅड. जमील देशपांडे, तर सदस्या म्हणून गायत्री खैरनार व अश्विनी शिरसाठ तसेच सदस्य म्हणून सुनील पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

या फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडविणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे हा मुख्य उद्देश असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या काळात रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, महिला सक्षमीकरण उपक्रम, युवकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम तसेच विविध जनहिताचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.

समाजहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याचा संकल्प *“शिवतेज नवनिर्माण फाऊंडेशन”* ने व्यक्त केला आहे.

No comments